18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते स्थगित, 45 वर्षावरील नागरिकांना मिळेल लस coronA Vaccination

18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते स्थगित

45 वर्षावरील नागरिकांना मिळेल लस

चंद्रपूर दि.13 मे : राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार  दि. 14 मे 2021 पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांकरिता सुरू असलेले कोविड-19 लसीकरण पुढील आदेशापर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे तर  45 वर्षावरील नागरिक, हेल्थ केअर वर्कर व फ्रन्टलाईन वर्कर याचे लसीकरण नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविशिल्ड लसीचे एकूण 7 केंद्र व कोव्हॅक्सिन लसीचे एकूण 11 केंद्र 18 ते 44 या वयोगटाकरिता राखीव असून उद्यापासून आरोग्य विभागाच्या पुढील आदेशापर्यंत लसीकरण स्थगित करण्यात येत आहे. मात्र 45 वर्षावरील नागरिकांकरिता कोविड-19 लसीकरण केंद्रात लसीच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केंद्र सुरू राहतील. याची सर्वांनी नोंद घ्यावी.असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

00000