दिलासादायक बातमी: महाराष्ट्र राज्यात आज 28,438 रुग्ण नविन सापडले, 52,898 रुग्ण बरे होऊन घरी परतले Corona maharashtra

दिलासादायक बातमी: महाराष्ट्र राज्यात आज 28,438 रुग्ण नविन सापडले, 

52,898 रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबई,18 मे : महाराष्ट्र राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्याही आता 30 हजारांच्या खाली आलीय. राज्यात आज 28,438 रुग्ण सापडलेत. राज्यात आज 679 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54% एवढा आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं ठाकरे सरकारनं कोरोना साखळी तोडण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनला काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. 

आज 52,898 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजपर्यंत एकूण 49,27,480 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.69 % एवढे झाले आहे. राज्यात आज 28,438 नवीन रुग्णांचे निदान झालेय. राज्यात आज रोजी एकूण 4,19,727 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 54,33,506 झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,15,88,717 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,33,506 (17.02 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 30,97,161 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 25,004 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.