*️⃣ गत 24 तासात 553 कोरोनामुक्त,
*️⃣ 179 पॉझिटिव्ह
*️⃣ 06 मृत्यू
चंद्रपूर, दि.31 मे : चंद्रपुर जिल्ह्यात गत 24 तासात 553 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 179 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 374 ने जास्त आहे. तसेच जिल्हयात 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज (दि. 31) बाधित आलेल्या 179 रुग्णांमध्ये
▶️ चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 48 रुग्ण,
▶️ चंद्रपूर तालुका 28,
▶️ बल्लारपूर 28,
▶️ भद्रावती 09,
▶️ ब्रम्हपुरी 10,
▶️ नागभिड 03,
▶️ सिंदेवाही 08,
▶️ मूल 16,
▶️ सावली 02,
▶️ पोंभूर्णा 01,
▶️ गोंडपिपरी 04,
▶️ राजूरा 02,
▶️ चिमूर 00,
▶️ वरोरा 04,
▶️ कोरपना 07,
▶️ जिवती 02
▶️ इतर ठिकाणच्या 07 रुग्णांचा समावेश आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 784 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 78 हजार 739 झाली आहे. सध्या 2हजार 598 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 71 हजार 286 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 86 हजार 229 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत 1447 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1342, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 38, यवतमाळ 48, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.
आज मृत झालेल्यामध्ये
👉🏻 चंद्रपूर शहरातील
45 वर्षीय महिला.
👉🏻 भद्रावती तालुक्यातील चिंचोली येथील 60 वर्षीय पुरुष,
65 वर्षीय महिला,
समर्थ वार्ड येथील 65 वर्षीय पुरुष.
👉🏻 राजुरा तालुक्यातील
देशपांडे वाडी परिसरातील 50 वर्षीय महिला.
👉🏻 गोंडपिपरी तालुक्यातील
किरमिरी येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
प्रशासनाचे आवाहन : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला किंवा कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून नागरिकांनी बाहेर यावे. कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी दैनंदिन मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे, या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. तसेच स्वत:ची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.