कोरोना मध्ये प्रत्यक्ष भेट घेऊ शकत नाही
प्रिय मॅडम
मी आपलं नाव व आपला फोटो फक्त वृत्तपत्रात तसेच प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहाच्या बाहेरील फलकावर बघितला होता. एक वेगळं वलय असलेलं भारदस्त व्यक्तिमत्व अशी माझ्या मनात तुमच्या बद्दलची प्रतिमा होती. सांस्कृतिक कला, नाट्य क्षेत्रात फार मोठं असलेलं आपलं नाव . . . त्यात झाडीपट्टी, तसेच इतर नाटय क्षेत्र या दुर्लक्षित भागातून आपल्या माध्यमांतून आपण एका नव्या शिखरावर नेऊन ठेवलं आहे. हे सर्वाना ज्ञात आहे. मला देखील आपल्याला भेटायची,काही नवं शिकण्याची एक ओढ लागली होती. तेव्हाच पदवी शिक्षण झाल्यानंतर मला गजानन ताजने सरानी 'एमएसडब्ल्यू' करण्याचा सल्ला दिला. तिथे तुम्ही मला प्रत्यक्ष शिक्षिकेच्या रूपात मिळाल्या हेच माझं भाग्य होत. माझी आई जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असल्यामुळे तिनेच प्राथमिक शिक्षण दिल. त्यामुळे शिक्षिका व पालक या दोन्ही रूपात माझी आई होती. परंतु मला पदयुत्तर शिक्षण घेतांना व नंतर या रूपात तुम्ही मिळाल्या. मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो कि शिक्षण झाल्यानंतर तुम्हीच नेहमी माझा हालहवाल विचारात होत्या. आज पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे कोरोना मध्ये प्रत्यक्ष भेट घेऊ शकत नाही. परंतु आज देखील तुमच्या समोर आलो कि पूर्वीचीच. आदर युक्त भीती असते मनात. त्यामुळे प्रत्यक्ष न भेटता तुमच्या बद्दलच्या भावना या पत्राच्या रूपात आपल्या पर्यंत पोहचविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
चंद्रपूरच नाट्य विश्व तुम्ही समृद्ध केलं हेही मी पाहतोय ... नव्या कलावंतांना तुम्ही घडवलंय हेही सगळं मी पाहतोय ... त्यामुळे परत एक शिक्षिका म्हणून एक अभिमान आणि आनंदही तितकाच होतोय.. एक शिक्षिका म्हणून तुमच्याकडे पाहताना एक दृष्टिक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तुमच्यातल्या सामाजिक जाणिवेने खरंतर मी भारावलो. मी जेव्हा व्यावसायिक समाज कार्यकर्त्याचे (MSW) चे शिक्षण असताना तुम्ही आम्हाला फक्त पुस्तकी समाजकार्य शिकविलं नाही. मला आजही तो प्रसंग आठवतो. तुम्हाला एक फोन आला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात 'दामू' नावाच्या दिव्यांग व्यक्ती होता. त्या परिसरात त्याचे छोटेसे झेरॉक्स चे दुकान होते. ती मशीन खराब झाल्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी तुम्ही स्वतःकडून ती मशीन खरेदी करून दिली होती. त्या मदतीतून त्याला आत्मनिर्भर बनवलं . परंतु त्याचे श्रेय स्वतःच्या पदरी न घेता आम्हा विद्यार्थ्यांकडून हि भेट असल्याचे तुम्ही सांगितले होते. त्यावेळी त्या दिव्यांग व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हसू बघून आम्हाला हि एक ऊर्जा मिळाली होती. तुमच्यातला हा समाजातील गरजू लोकांबद्दल असणारी तळमळ डोळ्यासमोर आली कि समोर तुम्हीच आठवत असतात. हे सर्व चित्र डोळ्यासमोर आलं कि आता देखील आठवते कि एका शिक्षकी पेशाला आपण किती समर्पक पणे न्याय देत आहात हे सहज लक्षात येत.
परंतु मॅडम आताची शिक्षण पद्धती बदलेली मला अनुभवाला मिळत आहे. आताचे मुलं विद्यार्थी बनण्यापेक्षा परीक्षाथी बनत आहेत. परंतु या काळात तुम्ही कलागुण संपन्न विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडवीत आहात.नेहमीसाठी विद्यार्थी म्हणून कौशल्यापूर्ण पद्धतीने जगावे यासाठी तुम्ही जो आशावाद पेरत आहेत. हि भूमिका समग्र शिक्षकाची कां असू नये ? यावेळेस तुमच्याकडे बघताना अब्राहम लिंकन यांच्या पत्राची आठवण येते कि त्यांनी आपल्या मुलाच्या संदर्भात मुख्याध्यापकाला लिहिलेलं ते पत्र आहे. ते पत्र वाचताना मी तितक्याच भावुकतेने तुमच्याकडे पाहतो. पत्र वाचले
तेव्हा मी हि भावुक झालो. तो कालखंड त्या पत्राचा आशय एक शिक्षिका म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्यात पाहावयास वेळोवेळी मिळतं जाणवतं शेवटी शिक्षक हे सामाजिक बदलाचे माध्यम आहे. आणि हाच तुमच्या जीवनानुभव तुमच्या या शिक्षकी पेशातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झिरपतोय. याच्या मी एक साक्षीदार आहे. आज तुम्ही जी पाऊलवाट सांगितली त्या पाऊलवाटेच्या माध्यमातून फक्त मीच नाही तर समाजात तुमचे हजारो मुलं समाज घडवीत आहेत. तुम्ही मला एक कानमंत्र दिला होता. तो आजही आठवतो. तो म्हणजे प्रत्येक मनुष्यामध्ये एक शक्ती (ऊर्जा) असते. त्या शक्तीचा / ऊर्जेचा आपण कसा वापर करतो. त्यावर त्या माणसाचे भविष्य ठरते. आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल कर फार बाप माणूस होशील हे तुमचे वाक्य आजही कानात एकू येते. समाजात वावरत असताना कुणी शिक्षण विचारलं कि व्यावसायिक समाज कार्यकर्त्याचे (MSW) चे शिक्षण घेतलं अस सांगताच *जयश्री कापसे- गावंडे मॅडम* यांनी तुला शिकवल का? असं विचारलं जात , हो म्हणताच समोरचा माणूस शांत बसतो. हि वेगळीच तुमच्यातील ऊर्जा आहे. मला नेहमी तुम्ही शिकवीत असताना तुमच्या सारखा संवाद मी देखील दुसऱ्या सोबत करावा. असं वाटायचं कारण तुमच्यातील ती खुप मोठी कला आहे. तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही पार्श्वभूमी नसलेलो.. भविष्याबद्दल गोंधळ असलेल्या विद्यार्थ्यांना एका उचित नेण्या योग्य वाट तुम्ही दाखवीत असतात. माझ्यात जो बदल झालेला दिसून येतो तो आपल्यामुळेच.. माफ करा मॅडम ! मी फार बोललो आहे, खूप काही राहूनही गेलं आहे. पुढे देखील असच सोबत राहा ..
तुमचाच
गोविल मेहरकुरे
9689988282