चंद्रपूर सुपर थर्मल पाॅवर स्टेशनमध्ये लागली भीषण आग ! Chandrapur CSTPS

चंद्रपूर सुपर थर्मल पाॅवर स्टेशनमध्ये लागली भीषण आग !

लोकतंत्र की आवाज़
चंद्रपुर, 02 मे: चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन मध्ये आज रविवार दिनांक 2 मे रोजी रात्रौ अकरा वाजता भिषण आग लागली असून आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे कामगारांची संख्या कमी असल्याचे कळते. वृत्त लिहीस्तोवर जिवीतहानी व वित्तहानी सविस्तर माहिती मिळू शकली नाही. आगीची भीषणता बघता मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. 
या संबंधात मुख्य अभियंता पंकज सपाटे यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी चंद्रपूर सुपर थर्मल पाॅवर स्टेशनमधील बॉयलर क्र. 8 व 9 मधील मेन्टेनन्स मधील केबल बंद झाल्यामुळे वीजपुरवठा बंद झाला शॉर्ट सर्किट झाले व त्यामुळेच आग लागली असून आज मोठ्या प्रमाणात हवा असल्यामुळे याआधीची भीषणता वाढली अशी माहिती त्यांनी दिली. नुकतेच अग्निशमन विभागाच्या गाड्या आले असून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. रात्रो 11 घ्या सुमारास ही आग लागली असल्याची माहिती मिळाली.

साभार- विदर्भ आठवडी