CORONA INDIA UPDATE: मागील 24 तासात देशात चार लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण

मागील 24 तासात देशात चार लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली, 01 मे : भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 4 लाख 01 हजार 993 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर गेली आहे. 3 हजार 523 कोरोनाग्रस्तांना कालच्या दिवसात प्राण गमवावे लागले. एकूण कोरोनाबळींचा आकडा 2 लाख 11 हजार 853 झाला आहे. 

देशात 24 तासात चार लाखांपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडण्याचा विक्रम नोंद झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 वर गेली आहे. त्यापैकी 32 लाख 68 हजार 710 सध्या सक्रिय (अॅक्टिव्ह) कोरोना रुग्ण आहेत. 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 रुग्ण कोरोना उपचारानंतर बरे झालेले आहेत, ही दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत भारतात 2 लाख 11 हजार 853 रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. गेल्या 24 तासात 3 हजार 523 कोरोनाग्रस्तांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
देशात एकूण कोरोनाग्रस्त : 1 कोटी 91 लाख 64 हजार 969
कोरोना उपचारानंतर बरे झालेले एकूण रुग्ण : 1 कोटी 56 लाख 84 हजार 406
देशातील एकूण कोरोनाबळी : 2 लाख 11 हजार 853
देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्ण : 32 लाख 68 हजार 710