कोरोना काळात सेवाभावी श्री जैन पार्श्वनाथ तीर्थ मंदीर ट्रस्ट भद्रावती व ऑक्सिजन उत्पादक उद्योग संचालकांचा हंसराज अहीर यांनी केला सत्कार #HansrajAhir #JainMandirBhadravati

कोरोना काळात सेवाभावी श्री जैन पार्श्वनाथ तीर्थ मंदीर ट्रस्टी भद्रावती व ऑक्सिजन उत्पादक उद्योग संचालकांचा हंसराज अहीर यांनी केला सत्कार

चंद्रपूरः जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असतांना प्रशासनासोबतच राजकीय नेते मंडळी, समाजसेवी संस्था तसेच जिल्ह्यातील प्रमुख उद्योग अशा सर्वांनी रूग्णसेवेसाठी समोर येणे आवश्यक आहे. आपण वाढत्या रूग्णसंख्येनुसार त्याच गतीने बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर या सर्व व्यवस्था करू शकलो तर नक्कीच जिल्हा कोरोना संकटातून बाहेर येईल. कोरोना संकटात रूग्णांसाठी सेवा देणाऱ्या भांदक येथील श्री जैन पार्श्वनाथ तीर्थ मंदीर ट्रस्ट भद्रावती व एम.आय.डी.सी येथील आदीत्य गॅसेस, रूक्मणी गॅसेस यांना भेट देऊन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शाल व श्रीफळ देऊ सत्कार सन्मान केला.
भांदक येथील श्री जैन पार्श्वनाथ तीर्थ मंदीर भद्रावती च्या इमारतीत ट्रस्ट च्या सहकार्याने कोरोना हेल्थ सेंटर व्यवस्थित सुरू आहे. या प्रेरणादायी अणुकरणीय कार्या बद्दल श्री जैन पार्श्वनाथ तीर्थ मंदीर भद्रावती चे ट्रस्टी श्री भिकमचंद बोरा, श्री प्रकाश कोठारी व डाॅ. सातभाई यांचे तेथे प्रत्यक्ष भेट घेऊन हंसराज अहीर यांनी सत्कार सन्मान केला.

चंद्रपूर एम.आय.डी.सी स्थित ईशान गोयल यांच्या आदित्य गॅसेस व भारत गौर यांच्या रूक्मनी गॅसेस प्लाॅंट ला अहीर यंानी भेट दे़ऊन चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड रूग्णांसाठी आॅक्सीजनचा पुरवठा करून रूग्णांचे जीव वाचवण्यात तुमचे योगदान असल्याचे संागत प्लाॅंट मालकांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार सन्मान केला. या आॅक्सीजन पुरवठ्याच्या पून्हा विस्तार करून समोरही ही सेवा सुरू ठेऊन रूग्णांची सेवा करा जिल्ह्यातील रूग्ण, रूग्णांचे परिवार व नागरीक आपले सदैव ऋणी राहील अशा भावना यावेळी हंसराज अहीर यांनी व्यक्त केल्या.