चंद्रपुरातील एकाच कुटुंबातील तीन पिढयांनी केली कोरोनावर मात! ,होय... कोरोनातुन बरे होता येते ! आम्ही बरे झालो.... मग तुम्ही कां नाही...? अनुभव कथन...!!!!


चंद्रपुरातील एकाच कुटुंबातील तीन पिढयांनी केली कोरोनावर मात!

होय... कोरोनातुन बरे होता येते !

आम्ही बरे झालो.... मग तुम्ही कां नाही...?

अनुभव कथन...!!!!
या वर्षात एप्रिल महिन्यात आमच्या कुटुंबातील उच्च रक्तदाब आणि मधुमेह चा आजार असलेली माझी आई कौशल्या श्रीनिवास तिवारी (वय 76 वर्ष), मी, सुनिल श्रीनिवास तिवारी (वय 43 वर्ष), माझी पत्नी सौ.स्मिता (वय 39 वर्ष) आणि मुलगी कु. सानिका (वय 17 वर्ष) आम्ही सर्वजण कोरोनाने बाधित होतो. 
ज्येष्ठ असलेली माझी आई, आत्ताच्या पिढीतील मी व माझी पत्नी व नव्या पिढीतील (Young generation) माझी मुलगी बाधित निघालो. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, न घाबरता, मानसिकरित्या न खचता, सुरुआती लक्षणे जाणवताच योग्य वेळी कोविड चाचणी केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समझताच डॉक्टरांचा सल्ला घेतला. औषधोपचार सुरू केला. गृहविलिगीकरणातील सर्व नियम पाळले आणि आज आम्ही सर्वांनी कोरोनाला पळवून लावलं. आम्ही जे केले ते तुम्हीही करू शकता.  नियमित हात धुणे, तोंडावर मास्क लावणे हा प्रथम आणि नियमित उपाय, गर्दीत जाऊ नये, सर्दी- खोकला असल्यास इकङं तिकङंचे फुकटचे सल्ले ऐकण्याऐवजी ङाॅक्टरकङे जावे. वेळीच उपचार करा आणि आनंदित राहून जगा!
सध्या जगभरात कोरोनाने कहर केलाय. भारत देश, आपला महाराष्ट्र आणि आपल्या चंद्रपूर शहरातही कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अनेक मित्रजण यात बाधित झालेत. यातून आम्हीपण सुटलेलो नाहीत. आमच्या तिन्ही पिढ्यांना कोरोनानं घेरलं. आज वैद्यकीय उपचारांती आम्ही सुखरूप आहोत. म्हणूनच आम्ही आपल्यात आहोत. कोरोना एक महाभयंकर आजार आहे आणि नाही, असेही म्हणता येईल. कोरोना झालाय म्हणजे वेगळी काही बिमारी नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत छोटेमोठे आजार आपल्याला होतच असतात. फरक केवळ या रोगाची गती अधिक आहे आणि तो संसर्गजन्य असल्याने एकापासून दुस-याला होतो. अनेकजण भिती आणि वैद्यकीय उपचाराअभावी जीव गमावून बसत आहेत. पण, घाबरण्याची अजिबात गरज नाही. लक्षणे दिसताच क्षणाचाही विलंब न करता वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. नाहीतर वेळ निघून गेली की ङाॅक्टरदेखील काही करू शकणार नाही. आज रुग्णांची संख्या इतकी वाढली की रुग्णालयात बेङ उपलब्ध नाही. बेङ मिळाला तर ऑक्सिजन नाही. ऑक्सिजन मिळाला तर रेमडेसिवर नाही. अशा भयावह स्थितीत मानसिक इच्छाशक्ती गळून पडते आणि शारिरीक व्याधी आणखी जोर धरते. पूर्वी हा रोग फक्त वयस्कांच होतो, अशी कल्पना होती. पण, कोरोनाने गणितं, भाकितं आणि अंदाज मोडून काढले. यातून कुणीही बचावणार नाही, हे सिद्ध केले. शासन निर्देशांचे पालन करा, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" यासोबतचं "माझा परिसर, माझी जबाबदारी" यावर ही भर द्या. 

✍🏻 सुनील श्रीनिवास तिवारी
       चंद्रपूर.