Maharashtra Lockdown Update : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याचे संकेत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार

Maharashtra Lockdown Update :
महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवण्याचे संकेत, 

अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार

मुंबई,10 मे : कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्र राज्यात 22 एप्रिलपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणामही महाराष्ट्र राज्यात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना आकडेवारीत घट दिसून येत आहे. मात्र तरीही रोज जवळपास 40-50 हजार कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळेच लॉकडाऊन आता 30 मे पर्यन्त कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 15 मे नंतर आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. 

लॉकडाऊन वाढणार की नाही याबाबत बुधवारी कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अनेक जिल्ह्यात अजूनही कोरोनाची परिस्थिती जैसे थे आहे. त्यामळेच 31 मे पर्यंत राज्यातील कडक निर्बंध कायम ठेवणार असल्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा दर वाढताना दिसतोय, त्यामुळे कोरोनाची साखळी मोडण्यासाठी लॉकडाऊन कायम ठेवलं जाऊ शकतं. 

लॉकडाऊनचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात येईल, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माहिती दिली आहे. लॉकडाऊनचा चांगला परिणाम राज्यात आणि मुंबईवर झाला आहे.  लॉकडाऊन करायचा नसेल तर कशा प्रकारे लॉकडाऊननध्ये रिलॅक्सेशन द्यायचं यावर विचार होईल. टास्क फोर्स आणि महाविकास आघाडी मिळून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असं अस्लम शेख यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन अजून वाढवण्याचे संकेत मिळत आहे. राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढवला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती मिळतेय. राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येतील वाढ अद्याप कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे राज्यात 15 मे पर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनमधील नियमावलीत कुठलीही सूट मिळणार नाही. त्यामुळे राज्यात 30 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू शकतो असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.