चंद्रपुर: पूर्व केन्द्रीय गृहराज्यमंत्री व भारतीय पार्टी ओबीसी मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराजजी अहिर यांच्या निवासस्थानी सौ . वंदना श्रीधर संतोषवार यांची भाजपा ओबीसी मोर्चा महिला आघाडी अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली पूर्व केन्द्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या तर्फे नियुक्ती पत्र देवून व वन्दनाना पुढील भविष्याच्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगरचे अध्यक्ष विनोद शेरकी, महामंत्री शशीकांत मस्के, युवती प्रमुख स्वाती देवाळकर, मिना मदावार यांची उपस्थिती होती.