पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून काँग्रेसला दारुबंदीचं गिफ्ट- आ. सुधीर मुनगंटीवार #MLASudhirMungantiwar

पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून काँग्रेसला दारुबंदीचं गिफ्ट- आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुर: या निर्णयावर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठविताना सरकारने अजब तर्क दिलाय. वर्धा-गडचिरोली जिल्ह्यातही हीच तस्करीची स्थिती आहे. शेतकरी वीज बिल माफ करा या मागणीऐवजी परमिट रूमवाल्यांना सूट द्या असे म्हणणाऱ्यांकडून यापेक्षा जास्त अपेक्षा नव्हती. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारने काँग्रेसला दारुबंदी हटवण्याचं गिफ्ट दिलंय.” या सरकारने कोरोना काळात दारुबंदी उठवून अमूल्य काम केल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.