राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारवर गोळीबार #राष्ट्रवादीकांग्रेसआमदार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारवर गोळीबार

पुणे,12 मे : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास घडली घटना आहे. ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. एका व्यक्तीनं केलेल्या गोळीबारात  कोणीही जखमी झालेलं नाही. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर आज दुपारी गोळीबार झाला. मात्र, या घटनेत कोणालाही जखम झालेली नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारासल घडली.

आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला मात्र, यामध्ये कोणालाही जखम झालेली नाही.