चंद्रपुरातील ७ वर्षाच्या चिमुकल्याने केले विक्रम, ५० टाइल्स एका मिनिटात एका हाताने तोडणे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसनी घेतली दखल #Break50TitlesInOneMinute

चंद्रपुरातील ७ वर्षाच्या चिमुकल्याने केले विक्रम

 ५० टाइल्स एका मिनिटात एका हाताने तोडणे

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसनी घेतली दखल

 चंद्रपुर, २६ मे : ५० टाइल्स एका मिनिटात एका हाताने तोडणे ही काही साधी सोपी गोष्ट नाही. पण ही किमया साधली ती चंद्रपूरच्या फक्त ७ वर्षाच्या एका चिमुकल्याने. हे कबीर हितेश सूचक असे ह्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याच्या ह्या अफाट प्रतिभेची दखल राष्ट्रीय स्तरावरील नामांकित अश्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसनी घेतली.
कबीर सूचक ह्याला लहानपनापासूनच कराटे ह्या खेळाची आवड होती. यापूर्वीही त्याने कराटे च्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. पण ह्यावेळेस काही वेगळे करावे ह्या उद्देशाने त्याने हा विक्रम करायचे ठरविले. त्यासाठी त्याने भरपूर सराव करून ह्याची पूर्वतयारी केली. आपली जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याने पहिल्याच प्रयत्नात हे यश प्राप्त केले. सदर विक्रमाचे सादरीकरण हे ऑनलाईन पद्धतीने 4 मे रोजी समितीच्या सदस्यांना दाखविण्यात आले. त्यानंतर त्यांनी योग्य पद्धतीने त्याचे मूल्यांकन करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये याची नोंद करण्याचा निर्णय घेतला.

14 मे रोजी समितिने या विक्रमाची नोंद आपल्या 
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड बुक मध्ये केली व त्यांनी हा पुरस्कार काल पोस्टाने पाठविले आहे.

 फक्त ७ वर्षाच्या चिमुकल्या ने हा भीमपराक्रम केल्या मुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने आपल्या ह्या यशाचे श्रेय आपले आजोबा मनीष वसंतिभाई सूचक, आजी शीला सूचक, आई, बाबा, काका, काकू, भाऊ व सूचक परिवारातील सर्व सदस्य तसेच आपले कोच संतोष सर, अमर सर, राकेश सर ह्यांना दिले आहे.