Reserve Bank Of India Alert: NEFT सुविधेबाबत RBI ची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी 14 तास सेवा बंद राहणार

Reserve Bank Of India Alert: NEFT सुविधेबाबत RBI ची मोठी घोषणा,

 ‘या’ दिवशी 14 तास सेवा बंद राहणार

 नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात बँकांच्या कामकाजाच्या वेळा बदलण्यात आलेल्या आहेत. सर्वाधिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीनं होत आहेत. व्यावसायिक आणि बँकांच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आरबीआय (RBI) म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ट्विट करुन ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी वापरली जाणारी एनईएफटी सेवा 23 मे रोजी 14 तासांसाठी बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. एनईएफटीद्वारे (NEFT) द्वारे आपण भारतातील कोणत्याही ठिकाणी बँकेच्या शाखेत न जाता पैसे पाठवू शकतो. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर सिस्टीम (NEFT) संपूर्ण देशात वापरली जाते. या सेवेद्वारे पैसे पाठवण्यासाठी किमान किंवा कमाल मर्यादा नसते. 
RBI ने त्यांच्या twitter हँडलवरुन ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. 22 मे रोजी बँकांचं कामकाज संपल्यानंतर टेक्निकल अपग्रेडेशन मुळे NEFT 23 मे रोजी 00:01 ते दुपारी 14:00 म्हणजेत (रात्रीच्या 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत) बंद राहिल. दुसरीकडे RTGS सेवा सुरु राहणार आहे.