कोरोना काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची 'कमाई' जोरात... #Youtube #NitinGadkari

कोरोना काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची 'कमाई' जोरात...

महिन्याला यूट्यूबकडून (YOUTUBE) मिळताहेत लाखो रुपये

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांमधील कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी गडकरींनी त्यांच्या आयुष्यात कोरोनामुळे झालेल्या बदलांचा आवर्जून उल्लेख केला. आधी मी सोशल मीडियावर जास्त अ‌ॅक्टीव्ह नव्हतो. पंतप्रधान मोदी सतत सांगायचे की सोशल मीडियावर अॅक्टीव्ह राहा. मात्र, ते जमायचं नाही. आता कोरोना आला आणि या संधीचे मी सोन्यात रुपांतर केले. आता मला यूट्यूबकडून (Youtube) माझ्या भाषणांसाठी पैसे मिळतात, असे सांगतानाच स्वतःच्या यूट्यूब चॅनेलसाठी यूट्यूकडून महिन्याला किती पैसे मिळतात? याबाबत गडकरींनी माहिती दिली.
कोरोना हे संपूर्ण जगावर आलेले संकट आहे. त्यावर विजय मिळविणे गरजेचे आहे. माझ्या जीवनामध्ये कोरोनामुळे दोन - तीन महत्वाचे बदल झाले आहेत. या काळात सकाळी सायंकाळी उठल्यानंतर २५ मिनिटे चालायची सवय मला लागली आहे. मी आधी संगीत वगैरे ऐकत होतो. मात्र, कोरोना काळात मला भगवतगीताही ऐकायची सवय लागली आहे. या काळात लोकांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे शक्य नव्हते. 
त्यामुळे मी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह झालोयाच काळात ९५० व्हिडिओ कॉन्फरंन्स घेतल्या. त्याद्वारे माझे १ करोड २० लाख ट्विटर फॉलोअर्स नव्याने जोडले गेले. सोबतच त्यांना यूट्यूकडून महिन्याला चार लाख रुपये कमाई सुरू झाली असल्याचे गडकरींनी सांगितले.
कोरोना काळातील अनुभवासंदर्भात एक पुस्तक लिहिलं असल्याचंही गडकरींनी सांगितलं. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या १० हजार इंग्रजीमधील प्रती प्रकाशिकत होण्यापूर्वीच विकल्या गेल्यात. यामध्ये कोरोनामुळे सोशल मीडिया आणि आयुष्यात झालेले बदल याबाबत उल्लेख असल्याचेही नितीन गडकरींनी सांगितलं.