भाजपा चंद्रपूर महानगर उपाध्‍यक्ष पदी महेंद्र मंडलेचा यांची नियुक्‍ती Bjp city vice president mandlecha

भाजपा चंद्रपूर महानगर उपाध्‍यक्ष पदी महेंद्र मंडलेचा यांची नियुक्‍ती

चंद्रपुर, 28 जुन : भारतीय जैन संघटनेचे राज्‍य उपाध्‍यक्ष कॉन्‍फीडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स च्‍या महाराष्‍ट्र शाखेचे सचिव तथा वर्धमान सोशल अॅन्‍ड एज्‍युकेशन अकॅडमी या संस्‍थेचे अध्‍यक्ष सुप्रसिध्‍द सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मंडलेचा यांची आज भारतीय जनता पक्षाच्‍या चंद्रपूर महानगराच्‍या उपाध्‍यक्ष पदी नियुक्‍ती करण्‍यात आली. 

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते त्‍यांना नियुक्‍ती पत्र प्रधान करण्‍यात आले. या प्रसंगी महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखीताई कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्‍थायी समिती सभापती रवी आसवानी, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्र सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभुषण पाझारे, रविंद्र गुरनुले हे उपस्थित होते. 

आ. मुनगंटीवार यांनी श्री. मंडलेचा यांना पक्षाच्‍या जबाबदारी बद्दल शुभेच्‍छा दिल्‍या व तनमन धनाने पक्षासाठी कार्य करावे अशा सुचना केल्‍या. मंडलेचा यांनी पक्षाने दिलेल्‍या जबाबदारी बद्दल आभार मानले.