उद्यापासून चंद्रपुर जिल्ह्यात दारूविक्री परवाना नूतनीकरण प्रक्रियेला सुरुवात, चंद्रपुर जिल्ह्यात तीन ठिकाणी स्वीकारले जाणार अर्ज, नवीन परवानासाठी धारकांनाही अर्ज करता येणार #ChandrapurDaruVikri

उद्यापासून चंद्रपुर जिल्ह्यात दारूविक्री परवाना नूतनीकरण प्रक्रियेला सुरुवात, 

चंद्रपुर जिल्ह्यात तीन ठिकाणी स्वीकारले जाणार अर्ज,

नवीन परवानासाठी धारकांनाही अर्ज करता येणार

चंद्रपुर,15 जुन : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्र शासनेने अधिसूचना जारी केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या तीनही खंडपीठात कॅवेट दाखल करण्यात आले. आता उत्पादन शुल्क विभागाने ३१ मार्च २०१५ पर्यंत परवानगी असलेल्या दारूविक्री परवानाच्या नूतनीकरणाचे काम सुरु केले आहे. 

उद्यापासून (16 जून 2021) चंद्रपूर, वरोरा आणि राजुरा येथे अर्ज स्वीकारले जाणार आहे. यासोबतच नवीन परवाना धारकांनाही अर्ज करता येणार आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्या दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र , दारूबंदीची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे बंदीच्या काळात कोट्यवधी रुपयांच्या दारूची अवैध विक्री जिल्ह्यात करण्यात आली. हजारोच्या संख्येने नवीन गुन्हेगार तयार झाले. यातून चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याची चर्चा जोर धरू लागली. त्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पालकमंत्री पदाची धुरा स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील दारूबंदी उठविली जाईल असे उघडपणे वक्तव केले. 

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दारूबंदीचा अभ्यास केला. त्यानंतर झा समितीनेसुद्धा दारूबंदीचा अभ्यास केला. या समितीच्या अहवालानंतर महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ८ जुन २०२१ रोजी गृह विभागाने अधिसूचना काढून परवाने नुतणीकरणाचे आदेश दिले. आता उत्पादन शुल्क विभागाने हि प्रक्रिया सुरु केली असल्याचे अधीक्षक सागर भोमकर यांनी सांगितले.