भरत शिंदे यांची चंद्रपुर शहर अध्यक्षपदी नियुक्ती
चंद्रपुर : आज दिनांक 20 रोजी चंद्रपूर सराफा असोसिएशन ची मिटिंग स्थानिक रूचिदा हॉटेल येथे संपन्न झाली .या मीटिंग मध्ये BSI हॉलमार्किंग या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली .व त्याची पूर्णपणे माहिती श्री राजेंद्रजी लोढा यांनी उपस्थितांना दिली व सराफा असोसिएशनला येणाऱ्या संभावित अडचणीबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली. यामध्ये उपस्थित सदस्यांमधून निवडणुकीद्वारे कार्यकारिणी घोषित करण्यात आली जिल्हाध्यक्षपदी श्री राजेंद्रजी लोढा यांची नियुक्ती करण्यात आली .
तसेच या सभेमध्ये चंद्रपूर शहराची कार्यकारीणी घोषित करण्यात आली कार्यकारीणी
अध्यक्ष - भरत शिंदे
उपाध्यक्ष - ओम सोनी
सचिव - विजय चांडक
सहसचिव - आशु सागोळे
कोषाध्यक्ष - रोशन कोठारी
सल्लागार समिती - सत्यम सोनी , राजेंद्र लोढा
कार्यकारिणी सदस्य - भिवराज कुकरा (सोनी) , संजय सराफ , नितेश लोढीया, प्रमोद लूनावत, मनोज डोमाडे, विनय जैन
यांची सर्वसंमतीने नियुक्ती करण्यात आली
या कार्यक्रमाला चंद्रपूर शहरातील बहुसंख्य सराफा व्यापारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुभाष शिंदे लाभले तर प्रमुख अतिथी प्रमोद लुनावत होते व माजी अध्यक्ष सत्यम सोनी यांचे मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र लोढा यांनी केले व आभार प्रदर्शन विजय चांडक यांनी केले.