चंद्रपूर महानगरपालिकेच्या आमसभेत अभूतपूर्व गोंधळ Chandrapur Shahar MahanagarpalikA Amasabha


चंद्रपूर महानगरपालिकेच्या आमसभेत अभूतपूर्व गोंधळ

चंद्रपुर, 29 जुलै: चंद्रपूर महानगरपालिकेच्या आमसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला आहे. काँग्रेस-भाजप नगरसेवक एकमेकांना भिडले असून महापौर यांनी काँग्रेस नगरसेवकांना फेकून मारली स्वतः ची नेमप्लेट मारली आहे.  मनपाच्या 200 कोटी अंकेक्षण अहवाल आक्षेप व अन्य विषयावर सत्ताधारी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटांमध्ये महापौर टेबल समोर झाली धक्काबुक्की झाली. 
डॉ. मंगेश गुलवाडे यांनी कोविड हॉस्पीटलच्या नावाखाली केलेली रुग्णांची लूट, हे विषय घेऊन काँग्रेस सदस्य महापौरांच्या समोर आले. हातात निषेधाचा फलक झळकावत हे सदस्य घोषणाबाजी करीत असतानाच महापौर राखी कंचरलवार यांनी या सदस्यांवर नेमप्लेट भिरकावली. त्यानंतर शाब्दिक युद्ध सुरू झाल्यावर स्थायी समिती सभापती रवी आसवानी हे खाली उतरले आणि काँग्रेस नगरसेवक नंदू नगरकर यांच्याशी भिडले. दोघात धक्काबुक्की झाली. प्रकरण तापत असल्याचं लक्षात येताच आयुक्त राजेश मोहिते आणि उपस्थित सदस्यांनी दोघांना वेगळं केलं. यावेळी शिवीगाळ झाल्याचंही या चित्रीकरणात ऐकायला येत आहे. 
शेवटी या गोंधळातच सभा तहकूब करण्यात आली. सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी करीत असून, प्रश्नही मांडू दिले जात नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेस नगरसेवक नागरकर यांनी महापौर यांच्यासमोरील टेबल ठोकल्याने वाद वाढला. महापौरांनी विरोधी सदस्यांनी सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले.