राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटलांचं ट्वीट; अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन
#Loktantrakiawaaz
#MedicalNews
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra NCP President) आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयाकडे रवाना झाले होते. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळतेय. अशावेळी स्वत: जयंत पाटील यांनी एक ट्वीट करुन आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचं कारण नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.
‘आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!’, असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयाकडे रवाना झाल्यामुळे चर्चा सुरु झाली होती.
दरम्यान, आज मंत्रिमंडळ बैठक सुरु असताना, जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे जयंत पाटील स्वत: बैठकीतून बाहेर चालत आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडे (Brij Candy Hospital) जाण्यासाठी निघाले. अस्वस्थ वाटू लागल्याने जयंत पाटील रुग्णालयात दाखल झाले आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयात जयंत पाटील यांच्यासोबत त्यांचा मुलगा आहे.