नदीपात्रातील ब्लू, रेड लाईनमध्ये बांधकामास परवानगी नाही, पूर परिस्थिती रोखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे maharashtra government to not allowed construction in blue and red line area in river

नदीपात्रातील ब्लू, रेड लाईनमध्ये बांधकामास परवानगी नाही, 

पूर परिस्थिती रोखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

#Loktantrakiawaaz
#KolhapurNews
कोल्हापूर, 30 जुलै : पूर परिस्थिती रोखण्यासाठी आता काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. हे निर्णय घेताना त्याला विरोध करू नका, असं सांगतानाच यापुढे नदीपात्रातील ब्लू लाईन, रेड (Blue Line And Red Line Area In River) लाईनमध्ये बांधकामांना परवानगी देण्यात येणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thakrey) यांनी आज स्पष्ट केलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापुरातील (Kolhapur) पूरस्थितीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्याला गावांचं पुनर्वसन करावं लागेल. काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. कठोर निर्णय घेतले नाही तर पाठी लागलेलं संकट आपल्याला सोडणार नाही. जेव्हा हे निर्णय घेऊ त्यावेळी त्याला साथ द्या. नदी पात्रात ब्लू आणि रेड लाईन आहे. त्यात झालेली अतिक्रमण आहेत. त्यामुळे पूर येत असतो. आता या पुढे ब्लू लाईन आणि रेड लाईनमध्ये बांधकामांना परवानगी देणार नाही. परवानगी देणार असाल तर या लाईन मारू नका. मग या लाईनला अर्थ काय? असं सांगतानाच लोकांचे जीव गमावणं परवडणार नाही. या गोष्टी संकटाच्या निमित्ताने कराव्या लागणार आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.