मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
#Loktantrakiawaaz
#LockdownNews
मुंबई, 29 जुलै : महाराष्ट्र राज्यातील कोरोना निर्बंधातून आणखी सूट मिळणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलयं. महाराष्ट्र राज्यात निर्बंध आहेत तसेच ठेवायचे की, त्यात आणखी सूट द्यायची, याबाबतचा अंतिम निर्णय हा स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबतची (Task force) बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री सध्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबच चर्चा करत आहेत. या बैठकीनंतर स्वत: मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील.
(Chief Minister Uddhav Thackeray's)
महाराष्ट्र राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट हा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथील दुकानांमध्ये वेळेत वाढ, तसेच उपहारगृहांच्या वेळेत वाढ केली जाऊ शकते. महाराष्ट्र राज्यात एकूण 15 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर एक टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामध्ये परभणी, बुलडाणा, धुळे, नांदेड, हिंगोली, अमरावती, वाशिम, वर्धा, नंदुरबार, जालना, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि नागपूरचा समावेश आहे.