सर्वाधिक सक्रिय रुग्ण ‘या’ जिल्ह्यात
#Loktantrakiawaaz
#CoronaUpdateNews
मुंबई, 28 ऑगस्ट : महाराष्ट्र सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतून सावरताना दिसत आहे. राज्य सरकारकडून कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, यासाठी नागरिकांनी कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू संसर्ग कमी होत असताना पाच जिल्ह्यांनी टेन्शन वाढवलं आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, सागंली आणि ठाणे (Pune, Satara, Ahmadnagar, Sangali, And Thane) जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.
Maharashtra State 5 District Covid-19 Patient Active
➡️ महाराष्ट्र राज्यातील कोरोनाची स्थिती कशी?
महाराष्ट्रात 27 ऑगस्टला 4654 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 170 रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील मृत्यूदर आता 2.12 टक्केवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील 62 लाख 55 हजार 451 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्यातील कोरोनामुक्तीचा दर आता 97.02 टक्के वर पोहोचला आहे.
➡️ महाराष्ट्र राज्यातील ‘या’ पाच जिल्ह्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण
महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, सांगली, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या 13715 सक्रिय रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात 7082, साताऱ्यात 5254 , सांगली जिल्ह्यात 4876 आणि अहमदनगर जिल्ह्यात 5295 सक्रिय रुग्ण आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संसर्गाची रुग्णसंख्या 64 लाख 47 हजार 442 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी 62 लाख 55 हजार 451 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. तर, राज्यातील कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 36 हजार 900 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 51 हजार 574 वर पोहोचला आहे.
➡️ देशातील कोरोना रुग्णसंख्या
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांत मिळून नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये तब्बल 21 हजारांची वाढ झाली असताना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 44 हजार 658 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 496 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. गेल्या 24 तासात भारतात 44 हजार 658 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 496 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 32 हजार 988 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
➡️ 27 ऑगस्टला 1 कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आले
भारतात सध्या कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम सुरु आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये 27 ऑगस्टला 1 कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. भारतातील कोरोना लस घेतलेल्यांची लोकसंख्या आता 62 कोटींवर पोहोचली आहे.