आम्‍हा भारतीयांचा मानबिंदू तिरंगाध्‍वज जगाच्‍या आकाशात उंच उंच जावो – आ. सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरातील तुकूम प्रभागात स्‍वातंत्र्यदिनानिमीत्‍त चश्‍मे वितरण, कोविड योध्‍दांचा सन्‍मान #ChandrapurTukum #MLASudhirMungantiwar #SudhirMungantiwar

आम्‍हा भारतीयांचा मानबिंदू तिरंगाध्‍वज जगाच्‍या आकाशात उंच उंच जावो – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरातील तुकूम प्रभागात स्‍वातंत्र्यदिनानिमीत्‍त चश्‍मे वितरण, कोविड योध्‍दांचा सन्‍मान

चंद्रपुर: आजचा दिवस आम्‍हा सर्वांसाठी पवित्र, आनंदाचा दिवस आहे. शहरात आज प्रचंड उत्‍साहाचे वातावरण आहे. शहरातील सामाजिक संस्‍था अतिशय उत्‍साहाने विविध कार्यक्रमाचे आयो‍जन करीत आहे. माझ्या, तुमचा, सर्वांचा मानबिंदू असलेला तिरंगाध्‍वज जगाच्‍या आकाशात उंच उंच जावो असा संकल्‍प करण्‍याचा आज दिवस आहे. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाचा संकल्‍प करताना भारतमातेचा ख-या अर्थाने जयजयकार होईल असे कार्य तुमच्‍या माझ्या प्रत्‍येकाच्‍या हातुन घडावे अशी अपेक्षा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली.

दिनांक १५ ऑगस्‍ट स्‍वातंत्र्यदिनाचे औचित्‍य साधुन चंद्रपूर शहरातील तुकूम प्रभागात मनपा सदस्‍य सुभाष कासनागोट्टूवार यांच्‍या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. महापौर सौ. राखी कंचर्लावार, स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, भाजपा महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा महानगर महासचिव सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे,प्राध्यापक श्रीकांत गोजे, रवी गुरणुले, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, विठ्ठलराव डूकरे, झोन सभापती छबू वैरागडे, नगरसेविका माया उईके,रमेश दडगल,पुष्पा उराडे,शितल गुरनुले, सौ. वनिता डुकरे, सोपान वायकर, शकुंतला गोयल,साधना उपगणलावर,रमेश कोसुरकर,ज्येष्ठ नागरिक तमगडगे, पुरूषोत्‍तम राऊत, माया मांदाडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार यांनी ५००० वृक्षांची लागवड करण्‍याच्‍या संकल्‍पाबद्दल ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन चे सुभाष कासनगोट्टूवार यांचे अभिनंदन केले. निसर्गचक्र बदलत आहे. अप्रत्‍यक्षपणे निसर्गाचा नुकसान आपल्‍या हातून होत आहे. अशा परिस्‍थीतीत वृक्ष लागवड करणे अतिशय महत्‍वाचे असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी घेतलेल्‍या ऐतिहासिक निर्णयांमुळे काश्‍मीर मध्‍ये आज तिरंगा डौलाने फडकत आहे. आमचा स्‍वाभीमान असलेल्‍या तिरंग्‍याला हात लावण्‍याची आतंकवादयांची हिंमत नाही, असे प्रतिपादन करत आ. मुनगंटीवार यांनी उपस्थितांना स्‍वातंत्र्यदिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्र चिकित्सा शिबिरात 550 नागरिक चष्म्यासाठी पात्र ठरले तसेच 112 मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी घंटा गाडी चालक, नाली सफाई कामगार आणि लसिकरण  नर्स यांचा साडी व ड्रेस देऊन सत्कार करण्यात आला.साजीद कुरेशी आणि डॉक्टर नयना उत्तरवार,शकुंतला गोयल रोटरी इन्नर व्हील चेअरमन  यांचा कोविड वॉरियर्स म्हणुन सत्कार तसेच  सौ वृशाली धर्मपूरिवार,श्री अन्याजी धवस आणि दादाजी नंदंवर,यांचा ग्रामगीताचार्य पदवी प्राप्त सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रज्ञाताई बोरगमवार, अमीन शेख, पुरुषोत्तम  सहारे,धनराज कोवे,गजानन भोयर,विजय चिताडे,आशिष ताजने आशिष बोंडे ,सचिन हरणे ,अरविंद मडावी, सुवर्णा लोखंडे,बंडू गौरकर, आकाश म्हस्के, सागर मुक्कावार,राकेश बोंगीरवर,नरेश वानखेडे,रतन दातरकर,अमोल तंगडपल्लीवर ,सुधाकर टिकले , सागर मुक्कावार, राकेश बोंगिरवार,वृंदाताई हलके, मनीषाताई ताजने ,राणी कोसे,धर्माजी खांगार, राकेश बोमांवर,धवल चावरे, पुरुषोत्तम राऊत, महंमद जीलानी ,बळी येरगुडे आदिनी अथक परिश्रम घेतले.

यावेळी गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, प्रभागातील ज्‍येष्‍ठ नागरिक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मनपा सदस्‍य सुभाष कासनागोट्टूवार यांनी केले. संचालन नौशाद सिद्दीकी यांनी तर आभार प्रदर्शन मंजूश्री कासनगोट्टूवार यांनी केले.