Corona Delta Plus: "या" जिल्ह्यावर नवं संकट, डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आढळल्यानं खळबळ,

Corona Delta Plus: "या" जिल्ह्यावर नवं संकट, 

डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आढळल्यानं खळबळ, 

#Loktantrakiawaaz
#CoronaDeltaNews
कोल्हापूर, 16 ऑगस्ट : कोल्हापूरकरांसाठी चिंताजनक बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. नवी दिल्लीतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या 100 नमुन्यांपैकी 7 नमुने डेल्टा प्लसचे (Delta Plus) असल्याचं आढळून आल्यानं कोल्हापूरमध्ये खळबळ माजली आहे. कोल्हापूर शहरात 3 तर जिल्ह्यात 4 रुग्णांची नोंद झालीय. कोल्हापूरमधील जनजीवन पूर्वपदावर येत असताना डेल्टा प्लसचे रुग्ण समोर आल्यानं खळबळ माजली आहे. डेल्टा प्लसच्या रुग्णांमुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसमोर नव आव्हान उभं राहिलं आहे. कोरोना आणि महापुराला तोंड देणाऱ्या कोल्हापूरसमोर या निमित्तानं नवं संकट उभं राहिलंय.

कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) कोरोना रुग्ण वाढ आटोक्यात येत असतानाच आता जिल्ह्यावर डेल्टा प्लस नवं संकट घोंगावत आहे. जिल्ह्यात रविवारी सात नवे डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण सापडले असून यामध्ये चार शहरातील तर तीन ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे. जून महिन्यात या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. जिल्ह्यात डेल्टा प्लसचे एकाच वेळेस सात रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली असून आरोग्य प्रशासन खडबडून जागे झालंय. पालकमंत्री सतेज पाटील यांनी देखील तात्काळ आरोग्य विभागाची बैठक घेऊन तालुकास्तरावर जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.