देशात तंत्रज्ञान क्रांती घडविण्यात राजीवजी गांधी यांचा मोठा वाटा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचे प्रतिपादन #Ittechnology #RajivGandhi #RamuTiwari

देशात तंत्रज्ञान क्रांती घडविण्यात राजीवजी गांधी यांचा मोठा वाटा

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचे प्रतिपादन

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे स्व. राजीवजी गांधी जयंती

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 20 अगस्त : देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या पुढाकारातून देशात तंत्रज्ञान क्रांती घडली. शहरांपासून खेडोपाडी आजघडीला दिसणारे संगणक व त्याचा वापर हा त्यांच्या कार्यकाळात सुरु झाला. त्यामुळे देशात तंत्रज्ञान क्रांती घडविण्यात राजीवजी गांधी यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. २०) राजीवजी गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात रितेश (रामू) तिवारी बोलत होते. यावेळी कामगार नेते के. के. सिंग, काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पडवेकर, काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष मनीष तिवारी यांनीही राजीवजी गांधी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाला चंद्रपूर शहर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, अनुसूचित जाती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुताई दहेगावकर, अनुसूचित जाती विभागाच्या शहर अध्यक्ष शालिनी भगत, मोहन डोंगरे, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, माजी नगरसेवक राजेश रेवल्लीवार, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, माजी नगरसेवक बापू अन्सारी, एकता गुरले, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, एनएसयूआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, युथ काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन कत्याल, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, राजू वासेकर, मनीष तिवारी, भानेश जंगम, धर्मू तिवारी, पप्पू सिद्दीकी, इरफान शेख, केशव रामटेके, संजय गंपावार, युसूफ चाचा, संदीप सिडाम, मोनू रामटेके, कुणाल रामटेके, राजेश वर्मा, विजय पाउणकर, तवंगर भाई, मंगेश डांगे, राज यादव, विजय धोबे, अजय बल्की, सुनील पाटील, संध्या पिंपळकर, पायल दुर्गे, सुरेश थापरे, कासिफ अली, गणेश निमकर, नेहा मेश्राम, ब्रिजेश तामगाडगे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते. संचालन कुणाल चहारे यांनी, तर आभार प्रसन्ना शिरवार यांनी मानले.