जालना जिल्ह्यात रक्तदान चळवळ उभारु - हस्तीमल बंब, रक्तदान हे अनमोल दान आहे - सतिश पंच #JalnaDistrictBloodDonation

जालना जिल्ह्यात रक्तदान चळवळ उभारु - हस्तीमल बंब

रक्तदान हे अनमोल दान आहे - सतिश पंच

जालना, 16 अगस्त: भारतीय जैन संघटना, व्यापारी महासंघ, जनरल मर्चन्टस् जिल्हा जालना तर्फे 75 व्या स्वतंत्रता दिवस आणि जैन संघटनेच्या संस्थापक श्री शांतिलालजी मुथ्था यांच्या वाढदिवसा निमित्त 15 अगस्त रोजी जनकल्याण रक्तकेंद्र, दवा बाजार, जालना येथे रक्तदान शिबीर पार पडला. शिबीराच्या उद्घाटना प्रसंगी राज्य अध्यक्ष हस्तीमलजी बंब प्रस्तावित करताना पुर्वी रक्तदान अधिकांक्ष शहरातच होत होते. ब्लडबँक, अ‍ॅम्ब्युलन्स, डॉक्टरांची टीम ग्रामीण भागात सुविधा नसल्यामुळे गावा मध्ये शिबीरे घेणे अवघड होते. मागील दोन वर्षापासुन कोरोनाच्या संकटात रक्ताचा तुटवडा भासत होता. त्या अनुसंगाने जिल्ह्यातील, ग्रामीण भागात मागील वर्षी संकटात 50 शिबीरे आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे नुकतेच जनकल्याण रक्तकेंद्रा मार्फत अध्यक्ष रमेशभाई पटेल (भाईश्री) यांच्या हस्ते जैन संघटना, व्यापारी महासंघाच्या व शिबीरे संयोजकाच्या पदाधिकार्‍यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. रक्तदानात जालना जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवसेवा हिच ईश्‍वर सेवा आहे, ही चळवळ जिल्ह्यात गोवो-गावी राबवु / उभारु गरजुचे प्राण वाचविण्यासाठी रक्तसाठा कमी पडु देणार नाही यासाठी विशेष करून ग्रामीण भागात जनकल्याण रक्तकेंद्र तर्फे सर्व सुविधा निःशुल्क देण्यात येत आहे त्याबद्दल रक्तकेंद्राला धन्यवाद देऊन अभिनंदन करण्यात आले, असे शेवटी बंब म्हणाले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अभियानात रक्तदार्‍यांचे व रक्तकेंद्राचे कौतुक करून रक्तदान करने हे फार मोठे पुण्याचे काम आहे. रक्तदान जीवनदान व अनमोल दान आहे, असे पंच म्हणाले. शिबीराचे उद्घाटना प्रसंगी सर्वप्रथम दृष्टीहिन (अंध) युवक अजय रुणवाल यांनी रक्तदान करून शिबाराचे शुभारंभ केले. या शिबीरात 28 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीरासाठी बंब व पंच यांच्या मार्गदर्शनाखाली सुखदेव बजाज, प्रविण मोहता, विजय सुराणा, कृष्णा पंच, नरेंद्र जोगड, रक्तकेंद्राचे पुसाराम मुंदडा, डॉ. शिवराज जाधव, शेळके मॅडम इ.नी परिश्रम घेतले. आभार प्रविण मोहता यांनी केले. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.