मॉल्स आणि चित्रपट गृहांबाबत काय निर्णय?
मुंबई, 11 ऑगस्ट : कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सुरु झाली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थितीत असून त्यांच्या उपस्थितीत हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गेल्या आठवड्यात हॉटेल चालकांनी भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. या निर्णयामुळे हॉटेलचालकांच्या लढ्याला यश आलंय. 15 ऑगस्टपासून हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत, असा निर्णय घेण्यात आलाय.
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असून हॉटेल चालकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे. हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. कमी आसनक्षमतेच्या अटीसह हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांपैकी आरोग्यमंत्री राजेश टोपे किंवा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
🏢 मॉल्स आणि चित्रपट गृहांबाबत काय निर्णय?
तर दुसरीकडे मॉल्स आणि चित्रपटगृहे यांच्या बाबत राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यासंदर्भातील कोणातही निर्णय अद्याप समोर आलेला नाही.
👉🏻 सिनेमागृह, मंदिरे आदेश येईपर्यंत बंद
सिनेमागृह आणि नाट्यगृह आणि धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. शॉपिंग मॉल 10 वाजेपर्यंत सुरु राहतील मात्र त्या ठिकाणी जाणारे आहेत त्यांचे दोन डोस झालेले असावेत. कार्यालयात शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्रथम लसीकरण देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
👉🏻 खाजगी कार्यालयात 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी
खाजगी कार्यालयात एकाचवेळी गर्दी करण्यापेक्षा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिफ्टमध्ये काम करता येईल. खाजगी कार्यालयातील कर्मचारी यांचे दोन डोस लस झालेली आहे त्यांना शंभर टक्के क्षमतेने कार्यालय सुरू राहतील.
👉🏻 विवाह सोहळा मंगलकार्यालयांना (हॉल) सूट
खुल्या जागेत जे विवाह सोहळा होणार त्यांना 200 लोकांची मर्यादा आणि हॉल मधील एकूण जागेच्या 50 टक्के मर्यादा परवानगी दिली आहे. नियमांचे पालन करणार नाही त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.