तीन सदस्यांची नियुक्ती
#Loktantrakiawaaz
#MPSCNews
मुंबई, 05 ऑगस्ट : MPSC वरील सदस्य नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तीन सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. देवानंद शिंदे, डॉ. प्रताप दिघावकर, राजीव जाधव यांचा समावेश आहे. राज्यपालांची रात्री फाईलवर सही झाल्यानंतर राज्य सरकारने आदेश काढले.
तिन्ही सदस्यांची नियुक्ती त्यांचा पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून 6 वर्षांसाठी किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत यापेकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहिल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्वायत्त असला तरी या आयोगाला पुरेसे सदस्यच मागील दोन वर्षांत राज्य सरकारने पुरवलेले नाहीत. एक सचिव आणि पाच सदस्य अशी या आयोगाची रचना असताना मागील दोन वर्षांपासून फक्त सचिव आणि एकच सदस्य अशा दोनच व्यक्ती आयोगाचे काम पाहत आहेत. आयोगाने तब्बल चार सदस्यांच्या जागा भरलेल्याच नाहीत. त्यामुळे तीन नवीन सदस्यांच्या नियुक्तीनंतर आता आयोगावर एकूण पाच सदस्य असतील.
एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा आता 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा 'अराजपत्रित गट ब'साठी ही परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा 'अराजपत्रित गट ब' संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 ही परीक्षा आधी 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 9 एप्रिल रोजी एमपीएससीकडून परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा 4 सप्टेंबर 2021 रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. याबाबत परिपत्रक काढून आयोगाने विद्यार्थ्यांना सूचित केले आहे. राज्य सरकारनं 3 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय कळवला होता.