विशेष म्हणजे त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले
#Loktantrakiawaaz
मुंबई, 20 ऑगस्ट : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आज कोल्हे त्यांच्या शिरुर मतदारसंघाचा दौरा करणार होता. दरम्यान कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यामातून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.
सध्या कोरोनाची दुसरी लाट सरली आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या दौऱ्यातदेखील वाढ झाली आहे. आज खासदार अमोल कोल्हे त्यांच्या शिरुरच्या दौऱ्यावर होते. यापूर्वी मागील दोन दिवसांपासून कोल्हे यांना कोरोनासदृश लक्षणे जाणवत होती. त्यानंतर चाचणी केल्यानंतर कोल्हे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले असूनदेखील त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.