सारा लहू बदन का ज़मीं को पिला दिया,
मुझ पर वतन का क़र्ज़ था मैंने चुका दिया !
देशाच्या विकासात स्व. राजीव गांधी यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने असलेल्या पुरस्काराच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जात होता. गांधी घराण्यांनी देशासाठी दिलेले योगदान, बलिदान देशातील जनता कधीही विसरू शकत नाही. मात्र, केवळ गांधी द्वेषातून पुरस्काराचे नाव बदलण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठे आहे. त्यांच्या नावाला विरोध नाही. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ दुसरा पुरस्कार देता आला असता. मात्र, केंद्र सरकारने तसे न करता राजीव गांधी यांच्या नावाने असलेल्या पुरस्काराचे नाव बदलविले. त्यामुळे केंद्र सरकारच्या या भूमिकेचा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.