Today 30 AUGUST : चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट Corona


Today  30 AUGUST : चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट 

✳️ 07 कोरोना वर मात 

✳️ 00 नविन पॉझिटिव्ह 

✳️ 00 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू

 #LokTantra_Ki Awaaz #ChandrapurCoronaNews
चंद्रपूर, दि. 30 ऑगस्ट :  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असून बाधितांची संख्येत लक्षणीय घट झाली आहे. विशेष म्हणजे दोन आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर सोमवारी (दि.30) जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर सोमवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 642 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 60  झाली  आहे. सध्या 42 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 73 हजार 215 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 82 हजार 777 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1540 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.