विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा Vidhan Parishad Upsabhapati dr nilam Gore Chandrapur Daura

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर दि. 9 ऑगस्ट : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दि. 11 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन, दुपारी 1 ते 2.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 2.35 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आगमन,  दुपारी 2.45 ते 3.30 वाजता अधिकाऱ्यांसमवेत कोरोना मुक्त गावांचा आढावा, दुपारी 3.30 ते 4.00 वाजता कोरोना काळात सामान्य नागरिक, कामगार, शेतकरी, मजूर यांना मदत देण्यासाठी शासनाच्या कृषी विभाग, कामगार विभाग, परिवहन विभाग, रोहयो व आदिवासी कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या योजनांचा आढावा. दुपारी 4 ते 4.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन  व राखीव.

दुपारी 4.15 वाजता पक्ष कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 4.15 ते 5 वाजता पक्ष कार्यालयात आगमन व पदाधिकाऱ्यांसमवेत विविध प्रश्नांबाबत चर्चा व मोहिमेचा आढावा. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.