वेकोली तर्फे खासदार बाळू धानोरकर यांच्याहस्ते वृक्षलागवड
चंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी जंगल गरजेचे आहे. अलिकडच्या काळात जंगल निर्मिती शक्य नसली तरी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करता येते. यातून दुष्काळावर मात करणे शक्य आहे. चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते त्यामुळे प्रत्येकानी दिवस व वृक्ष लागवडीला कुठलेही कारण न शोधात वृक्षलागवड करण्याची गरज आहे. वृक्ष लागवड म्हणजे प्रदूषणमुक्त समाजरचनेची चळवळ असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते ताडाली येथील वेकोलिने आयोजित केलेल्या वृक्षलागवडी प्रसंगी बोलत होते.
यावेळी काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे, महाप्रबंधक वैरागडे, काँग्रेसचे युवा नेते राज यादव, ताडाली येथील सरपंच व इतर अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, वृक्षरोपण किंवा वृक्ष लागवड फक्त उद्दिष्टपूर्ती करिता करू नये. चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणात वेकोलि व इत्तर उद्योग आहेत. यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते. येथील परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे अतिशय महत्वाची आहे. माणूस जन्माला आल्या पासून ते मारत पर्यत वृक्षाच्या वापर करीत असतो. परंतु आपण किती वृक्ष लावतो व त्यातील किती वृक्ष जागवतो हे देखील आपण विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करून प्रदूषणमुक्त समाजरचनेची चळवळ सुरु करण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.