चंद्रपुर, 07 सेप्टेंबर : आज कृषी उत्पन्न बाजार समिती, रामनगर येथे अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, चंद्रपूर जिल्हा तर्फे सर्व भाजी व फळ विक्रेत्यांना आणि भाजीच्या ठेलेवल्यांना निःशुल्क फेस मास्कचे वितरण करण्यात आले. ०७ सप्टेंबर ११९२ ला अखिल भारतीय अधिवक्ता परिषदची स्थापना झाली होती व दर ०७ सप्टेंबरला संपूर्ण भारतातील अखिल भारतीय अधिवक्ता परिषद सर्व शाखा स्थापना दिवस म्हणून साजरा करतात.
मागील काही वर्षापासून कोरोना ही महामारी सर्वत्र जगात पसरलेली आहे आणि राज्य प्रशासन व केंद्र प्रशासनाच्या निर्देशा द्वारे सर्व नागरिकांना कोरोना रोगाच्या संक्रमणा पासून वाचण्यासाठी फेस मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कार्यक्रमात अखिल भारतीय अधिवक्ता परिषद,चंद्रपूर जिल्ह्याचे सचिव ॲड.संदीप नागपुरे यांनी सर्वांना हे कळविले की, कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे आणि फेस्क मास्क वापरल्याने हे संक्रमण कमी होईल. भाजी व फळ विक्रेता नागरिकांच्या सरळ संपर्कात येतात व सर्वांनी फेस मास्क वापरल्यामुळे कोरोना संक्रमणचे प्रमाण घटते.
या उपक्रमात अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष ॲड.अभय कुल्लरवार, सचिव ॲड.संदीप नागपुरे, ॲड.अभय पाचपोर, ॲड.आशिष धर्मपुरीवार, ॲड.गोपाल पाटील, ॲड.अमन मारेकर, ॲड.गिरीश मार्लीवार, ॲड.विनय लिंगे, ॲड.नितीन गाटकिने, ॲड.श्रीकांत धागमवार, ॲड.राशिद शेख, ॲड.सोमेश पंढरे, ॲड.राजेश जुनारकर, ॲड.उमेश देशपांडे, कृषि उत्पन्न बाजार समिति सदस्य चवरे, ॲड.आशिष मुंधडा आणि इतर अधिवक्तांनी सहकार्य केले.