नागपुरात तीन दिवसानंतर अधिक कड़क लॉकडाऊन :पालकमंत्री डॉ नितिन राऊतकसे असतील निर्बंध? In Three Days Again Lockdown In Nagpur

नागपुरात तीन दिवसानंतर अधिक कड़क  लॉकडाऊन : पालकमंत्री डॉ नितिन राऊत

कसे असतील निर्बंध?

#Loktantrakiawaaz
#LockdownNews

नागपूर, 06 सेप्टेंबर : नागपुरात येत्या तीन दिवसात लॉकडाऊनचे अधिक कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. हे निर्बंध लावताना रेस्टॉरंट, दुकानांच्या वेळा कमी करण्यात येणार आहे. तसेच विकेंडला संपूर्ण लॉकडाऊनही लावण्यात येणार असल्याचं सूतोवाच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.

 पालकमंत्री नितीन राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. जिल्ह्यात आज सकाळी 13 पॉझिटिव्ह पेशंट आढळले. त्यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. तसेच या 12 रुग्णांनी कोरोनाचे दोन डोस घेतले होते, तरीही त्यांना कोरोना झाला. त्यामुळे बिनधास्त राहू नका. मास्क लावा आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे. तसेच आज 78 सँपल जिनम सिक्वेन्ससाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल काय येतो ते पाहू, असं सांगतानाच जेव्हा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या एक आकडीवरून दोन आकडीवर जाते तेव्हा कोरोनाचा धोका वाढल्याचं समजून जायचं असतं. सध्या जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याने खबरदारी घेतली जात आहे, असं राऊत म्हणाले.

सध्या गेल्या दोन दिवसांपासून बाधित रुग्ण दोन आकडी संख्येत वाढले आहेत. अशीच सुरुवात दुसऱ्या लाटेची देखील झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात जिल्ह्यात झाली आहे, असे समजून उपाययोजना करण्याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी एकमत व्यक्त केले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची व शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेवून कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, पुढील तीन दिवसांत यासंदर्भातील निर्णय घोषित करावा, अशी सूचना त्यांनी केली. सध्या रात्री दहापर्यंत हॉटेल्स सुरु आहेत. त्यावेळेत कपात करण्याबाबतचे सुतोवाच या बैठकीत करण्यात आले. प्रशासनामार्फत पुढील तीन दिवसानंतर नागपूर जिल्ह्यातील निर्बंधाची घोषणा केली जाणार आहे.

तिसऱ्या लाटेत आयसीएमआरने ज्या उपयायोजना करायला सांगितल्या आहेत. त्यानुसार तरतुदी करण्यात आल्या आहेत. लहान मुलांसाठी बेड तयार ठेवण्यात आल्या आहेत. दोन डोस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बिनधास्त राहू नका. मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा, गर्दी टाळा, दोन लसी घेतलेल्यांसह सगळ्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.