जय बजरंग गणेश मंडळाव्दारे श्रीं च्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा Jai Bajarang Ganesh Mandal dwara shri

जय बजरंग गणेश मंडळाव्दारे श्रीं च्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा

चंद्रपूर:- श्री गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर जय बजरंग गणेश मंडळ, गिरणार चैक चंद्रपूर व्दारा श्रीं च्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा भाजयुामोचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मंडळाचे सहसचिव रघुवीर अहीर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी श्री गणेशांच्या मुर्तीचे विधीवत पुजन करून पूर्व केद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी गणेशस्तवन करीत महाआरती केली.
या शुभ प्रसंगी गणेश मंडळाचे अध्यक्ष सुरेश अडपेवार, शामल अहीर, महेश अहीर, मोहन चैधरी भाजप महानगर उपाध्यक्ष, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, राजु येले, राजु घरोटे भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष, विनोद शेरकी भाजपा ओबीसी मोर्चा महानगर अध्यक्ष, धनराज कोवे भाजपा आदीवासी मोर्चा महानगर अध्यक्ष,  अनिल दाभाडे,  गिरीष अणे, पुनम तिवारी,विकास खटी, राहुल गायकवाड, अनुज सोनी, चेतन शर्मा , प्रवीण चनारकर, अभिनव लिंगोजवार, रामप्रवेश यादव, सुदामा यादव, मुकेश यादव, गंगाधर कुंटावार यांचेसह अनेक भक्तगणांची उपस्थिती लाभली होती. जय बजरंग गणेश मंडळाचे यंदा 55 वे वर्ष आहे. कोरोना काळात भाविकांनी प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.