महाराष्ट्रातील वीज निर्मिती करणारे 27 पैकी 7 संच बंद, सकाळ-संध्याकाळी वीज जपून वापरा: ऊर्जा मंत्री नितिन राऊत #Maharashtra #ElectricityGeneration #महाराष्ट्रसरकार

महाराष्ट्रातील वीज निर्मिती करणारे 27 पैकी 7 संच बंद, 

सकाळ-संध्याकाळी वीज जपून वापरा: ऊर्जा मंत्री नितिन राऊत

#Loktantrakiawaaz
मुंबई, 12 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्यात भारनियमन होण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी महत्त्वाची माहिती देऊन राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. राज्यात वीज निर्मिती करणारे 27 पैकी 7 संच बंद आहेत. कोळश्याच्या (Coal Crises) अभावी हे संच बंद करावे लागले आहेत. त्याला कारणीभूत कोल इंडिया असल्याचं सांगत राज्यात कुठेही लोडशेडिंग (Loadsheding) करण्यात आलेली नाही. नो लोडशेडिंग हा आमचा कार्यक्रम आहे, असं नितीन राऊत यांननी सांगितलं.

नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद (Press Conferance) घेऊन महाराष्ट्र राज्यातील विजेची परिस्थिती आणि कोळश्याच्या तुटवड्यावर महत्त्वाची माहिती दिली. कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती (Electric Generation) कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची वीजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे, अशी माहिती राऊत (Information) यांनी दिली. राज्यात मागणीच्या तुलनेत 3 हजार मेगावॅट विजेची कमतरता जाणवत आहे. ही विजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांना कोळशाचा नियमित पुरवठा व्हावा यासाठी मी मागील दोन महिन्यांपासून केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) व केंद्रीय ऊर्जा मंत्री मा. आर. के. सिंग (R. K. Singh) यांच्याशी नियमित संपर्कात असून लवकरच या संकटावर आम्ही मात करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर मी सर्व ग्राहकांना जाहीर नम्र आवाहन करू इच्छितो की सध्याची वीज टंचाईची परिस्थिती लक्षात घेता सकाळ व संध्याकाळी 6 ते 10 या वीज मागणीच्या कमाल कालावधीत आपल्या घरातील विद्युत उपकरणांचा कमीत कमी वापर करून वीज बचत करून महावितरणला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी यावेळेस केले.

महानिर्मितीची एकूण स्थापित क्षमता 13 हजार 186 मेगावॅट आहे. याशिवाय अन्य कंपन्यांकडूनही महावितरण वीज खरेदी करीत असते. कोळसा टंचाईमुळे 4 आणि देखभाल दुरूस्तीमुळे 3 असे 7 संच बंद असल्याने राज्याला 3 हजार मेगावॅट वीजेची तूट जाणवू लागली आहे. महानिर्मितीने कोळसा आणि वीज उत्पादन व्यवस्थापनात उत्तम समन्वय आणि संतुलन राखल्याने कोळशाची आवक वाढली आणि वीज उत्पादन वाढवून सुद्धा कोळसा साठ्यात सुधारणा होत आहे, असं त्यांनी सांगितलं.

साधारणपणे पावसाळ्यात म्हणजे जून-सप्टेंबरपर्यंत विजेच्या मागणीत घट होत असते. परंतु, ऑगस्ट महिन्यात दुर्देवाने पावसाने जोर धरला व त्यामुळे विजेची प्रचंड मागणी वाढली. त्यामुळे या मागणीची पूर्तता करण्यासाठी 18 लाख मॅट्रिक टन कोळसा साठा वापरावा लागला. कोळसा वाहून नेण्याची कोल इंडियाची (Coal India) रोजची क्षमता 40 लाख मॅट्रिक टन (40 Lakh Metric Ton) आहे. मात्र पावसामुळे ती 22 लाख मॅट्रिक टन इतकी खाली आली होती. ती आता 27 लाख मॅट्रिक टनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कोल इंडियाने आपल्या वहन क्षमतेनुसार पुरवठा करावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या व्यतिरिक्त जो कोळसा कोल इंडियाकडून मिळतोय तोही अपेक्षित दर्जाचा नाही. त्यामुळे विजेचे उत्पादन व गुणवत्ताही अपेक्षित प्रमाणानुसार होत नाही, असं सांगत त्यांनी कोल इंडियाकडे (Coal India) दाखवलं.