#Loktantrakiawaaz
चंद्रपूर: चंद्रपूर शहर आणि जिल्हा सराफा असोसिएशन (Chandrapur City District Sarafa Association) च्या संयुक्त विद्यमाने सराफा व्यावसायिकांच्या नव्या कायद्यावर समाधान सेमिनार चे आयोजन नुकतेच चंद्रलोक लॉन (Chandralok Lawn) येथे करण्यात आले होते. माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर (Ex. Home Minister State Hansraj Ahir) यांच्या हस्ते सेमिनार चे उद्घाटन करण्यात आले.
हॉलमार्क आणि एचयूआयडी (Hallmark And HUID) च्या संदर्भात शास्त्रीय आणि कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी या सेमिनार ला पुणे (Pune) येथील तज्ज्ञ व्यवसायी फतेहचंद रांका (Fatechand Raka), अकोल्याचे (Akola) नितीन खंडेलवाल (Nitin Khandelwal), नागपूर (Nagpur) चे राजेश रोकडे (Rajesh Rokade), पुरुषोत्तम कावळे (Puroshattam Kawale), असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोढा, शहर अध्यक्ष (President) भरत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सराफा व्यावसायिकांनी एकता ठेवत, कायदा-नियमा च्या चाकोरीत सद्व्यवहार करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान शहरातील 9 अनुभवी आणि उत्कृष्ठ सेवा प्रदाता व्यावसायिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शहर सचिव मनोज डोमाळे यांनी केले. संचालन व आभार जिल्हाध्यक्ष लोढा यांनी मानले. कार्यक्रमासाठी मितेश लोढ़ीया, समीर आकोजवार, आशू सांगोडे, प्रवीण जुमडे, राकेश ठकरे, हिरालाल सोनी, भिवराज सोनी यांनी अथक परिश्रम घेतले.