प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा नॉमिनी ठरवायचा अधिकार केवळ भूस्वामींचा, धोपटाला प्रकल्पग्रस्तांना खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण #DhoptalaWCL #ChequeDistribution #WCL

प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा नॉमिनी ठरवायचा अधिकार केवळ भूस्वामींचा

धोपटाला प्रकल्पग्रस्तांना खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर : वेकोलिच्या (WCL) नियमानुसार रक्ताच्या नात्याचे कारण दर्शवून भूस्वामींच्या नॉमिनीना अनेक वेळा नाकारले जाते, जावई, नातीन, विवाहित मुलगी इत्यादींना नाकारणे अन्याय असून यात संशोधन करण्याची गरज आहे.  ज्याची जमीन त्याला नॉमिनी ठरवायचा अधिकार असा बदल करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी केले. ते बल्लारपूर वेकोलि (Ballarpur WCL Area) क्षेत्रातील धोपटाला (Dhoptala)  प्रकल्पग्रस्तांना धनादेश (Bank Cheque) वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

यावेळी आमदार सुभाष धोटे (MLA Subhash Dhote), क्षेत्रीय महाप्रबंधक डे, राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, ओबीसी नेते उमाकांत धांडे, येरणे, पुलैया तसेच शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी आमदार सुभाष धोटे म्हणाले कि, या केंद्रात व राज्यात माजी मंत्र्यांच सरकार होत. परंतु ते माजी मंत्री आपल्याला न्याय देऊ शकले नाही. परंतु पद गेल्यानंतर ते  आता राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या दारी येऊन हे सर्व मीच केलं असा गवगवा करीत आहेत. परंतु आता त्यांचा राजकीय हेतू लक्षात घेता त्याला बळी पडता काम नये असे त्यांनी प्रकल्पग्रस्तांना सांगितले. इतके वर्षे पदावर असतांना त्यांची कोणी अडवणूक केली होती असा सवाल त्यांनी केला. 
यावेळी रामभाऊ वांढरे, शुभम मांडवकर, कुणाल मांडवकर, विनोद नक्षीने, संजय वैरागडे, विजयलक्ष्मी परसोटवार, रुपेश नक्षीने, बालाजी या प्रकल्पग्रस्तांना खासदार बाळू धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांचे शुभहस्ते चेक वाटप करण्यात आले. 

खासदार बाळू धानोरकर यांनी धोपटाला प्रकल्पग्रस्तांना व वेकोलिला (WCL) भरपूर सहकार्य केले. धोपटाला प्रकल्प खासदार बाळू धानोरकर यांच्या मदतीने मार्गी लागला, त्यांच्या मध्यस्तीने पॉवर कंपन्यांसोबत  MOU करण्यात आला असे प्रतिपादन क्षेत्रीय महाप्रबंधक डे  यांनी केले. 

आता सुमारे १५० करोड चे वाटप शेतकऱ्यांना होत असून ८२० नोकऱ्या प्रकल्पात देत आहे. त्यापैकी ७५० प्रकल्पग्रस्तांना नोकरीचा मार्ग मोकळा झाला असून ५०-६० प्रकल्पग्रस्तांना लवकरच नोकरी मिळणार आहे.
यापुढे प्रकल्पग्रस्तांना एकरी २० लाख रुपये दरासाठी आपण प्रयत्न करणार, ८ ते १०  लाख रुपये प्रतिएकरचा दर पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केला. चेअरमन CIL, ऊर्जामंत्री, CMD सर्वांसोबत बैठक घेतल्यावर धोपटालाचा प्रश्न मार्गी लागला. पुढे देखील येथील शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्र (Bhumi Putra) म्हणून मी सदैव सोबत राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.