MNS President Raj Thackeray Corona Positive: अध्यक्ष राज ठाकरें कोविड पॉजिटिव #MNS #RajThackeray #कोरोना #Covid-19

MNS President Raj Thackeray Corona Positive: अध्यक्ष राज ठाकरें कोविड पॉजिटिव

#Loktantrakiawaaz
मुंबई, 23 ऑक्टोबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thakrey) यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंला देखील (Raj Thakrey's  Mother Also Covid-19 Positive) कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच (Home Isolation)उपचार करण्यात येत आहेत. ही माहिती मुंबई महापालिकेच्या (Mumbai BMC) अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. विशेष म्हणजे फक्त राज ठाकरेच नाही तर त्यांच्या आई यांनाही कोरोनाची (Covid Positive) लागण झालेली आहे.

कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे सक्रिय झालेले आहेत. गेल्या काही काळात त्यांनी पुण्याला मोठ्या प्रमाणात दौरे केलेत. फक्त पुणेच नाही तर नाशिकचाही (Pune, Nashik) राज ठाकरेंनी दौरा केलेला आहे. बहुतांश ठिकाणी राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही. विशेष म्हणजे संपूर्ण कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही.