पतसंस्था महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी दुवा ठरावा : खासदार बाळू धानोरकर Pathsanstha Mahilanchya arthik sabalikarnasathi duva tharava

पतसंस्था महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी दुवा ठरावा : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर :  महिलांच्या स्थितीचा विचार करता शिक्षण व राजकीय प्रतिनिधित्व या बाबतीत भारताची स्थिती सुधारली असली, तरी आर्थिक स्तर सुधारण्याच्या मोठा पल्ला गाठायचा आहे. या बाबतीत महिलांच्या आर्थिक सबलीकरणाकरिता पतसंस्था दुवा ठरेल असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते आपली अर्बन को - ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमी, चंद्रपूर च्या १ ल्या वर्धापन दिनानिमित्य ते बोलत होते.
 
 यावेळी काँग्रेसचे गटनेते डॉ सुरेश महाकुलकर, जेष्ठ नेते रमेश देशमुख, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, नगरसेवक सुरेश पचारे, युवा नेते सतीश भिवगडे, युवा नेते जयदीप रोडे, राजेश नायडू यांची उपस्थिती होती. 
 पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, महिला ह्या आर्थिक दृष्ट्या व्यवहारात माणसाच्या तुलनेत अधिक पारदर्शक असतात. महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून मोठी आर्थिक क्रांती केली असल्याचे अनेक उदाहरण आपल्याला माहित आहे. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ अनेकदा मिळत नसल्यामुळे त्यांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक सबलीकरणासाठी पतसंस्थानी पुढे येऊन दुवा बनावा असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.