आणि डॉ.मंगेश गुलवाडेंनी रस्त्यावरच केला उपचार.... गाडीतील प्रथमोपचार किट आली कामी #RoadAccident #BJPChandrapurPresident #BJP

आणि डॉ.मंगेश गुलवाडेंनी रस्त्यावरच केला उपचार....

गाडीतील प्रथमोपचार किट आली कामी

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 24 ऑक्टोबर: एखादा अपघात (Accident) झाला की सर्वसाधारणपणे लोकं हल्ली व्हीडिओ व फोटो काढून (Video And Photo) मोकळे होतात.अपघातग्रस्तला इस्पितळात न्यावे, याचेही भान अनेकांना राहत नाही. पण यात काही अपवादही असतात. पण यासाठी हवी असते संवेदनशीलता. असा एकव्यक्ती जरी अपघातस्थळी पोहोचला तर अपघातग्रस्तांसाठी ती देवदूत ठरतो.असाच काहीसा प्रकार रविवार (24 ऑक्टोबर) ला घडला.महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे ( BJP Chandrapur City District President) "त्या"अपघात ग्रस्तासाठी जणू देवदूत ठरले.
रविवारला पक्षाच्या एका बैठकीसाठी जात असतांना, एका अपघातात मोरवा (Morva) येथील विनोद थेरे यांना जबर मार बसला ते खाली पडले होते. हि बाब बाबूपेठ येथे भाजपाच्या एका कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्या गाडीत असणारे डॉ गुलवाडे यांनी वाहन थांबविले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी गाडीत असलेली प्रथमोपचार किट काढली व रस्त्यातच त्याची तपासणी करून त्याचेवर प्रथमोपचार केला. तो पर्यंत आणखी काही लोकं तिथं जमा झाले. डॉ गुलवाडे यांनी त्यांना प्रकृती बघून 5 दिवसांनी हॉस्पिटल (Hospital) ला येण्याचा सल्ला दिला.डॉ गुलवाडे यांची संवेदनशीलता बघून अनेकांनी कौतुक केले.
यावेळी महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर मंडळ महामंत्री रितेश वर्मा यांनी ही अपघातग्रस्त थेरे यांना धीर दिला.