एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू #STWorkers #Uposhan #StateTransport

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 28 ऑक्टोबर: एस टी (S T Workers) कर्मचारी चे सर्व कर्मचारी चंद्रपूर विभाग (Chandrapur) मधील चंद्रपूर आगार , राजुरा आगार, चिमूर ,वरोरा आगार सर्व कर्मचारी, आणि चंद्रपूर विभाग  येथे संयुक्त कृती समितीचे चंद्रपूर विभागीय स्तरावर, आणि राज्य स्तरावर नेत्यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर आगार यांच्या सर्व संघटनांने पाठिंबा देऊन चंद्रपूर बसस्थानक येथे आंदोलन सुरू

दिनांक 27 ऑक्टोम्बर 2021 ते 28 ऑक्टोम्बर राज्य स्तरीय कृती समितीच्या माध्यमातून चंद्रपूर विभागीय  कृती समितीने आपल्या उर्वरित D. A ,HRA , इन्क्रीमेंट , बोनस, दिवाळी ऍडव्हान्स (Dipawali Advance Payment) सोबत , एस.टी कर्मचारी यांच्या शासनाकडून मुद्दाहून निर्माण केलेल्या समस्ये साठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एस. टी महामंडळ चे विलीनीकरण महाराष्ट्र शासनात (Maharashtra Government) करावे या मुख्य मागण्यांसाठी , 27/28 ला शासनाकडून मागण्या पूर्ण न झाल्यामुळे 28 तारखेच्या मध्यरात्री पासून संपूर्ण महाराष्ट्रा सह चंद्रपूर विभागातले चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोरा आगार सह विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा चे कर्मचारी उद्या दिनांक- 29/10/2021 तारखेपासून बेमुद्दत संपावर जाणार आहेत, आता कर्मचारी D.A ,HRA, इनक्रिमेंट, या क्षुल्लक मागण्या साठी संप न करता, जो प्रयन्त एस.टी महामंडळचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करीत नाही, तो प्रयन्त संप मागे घेतल्या जाणार नाही, आपल्या निर्णयावर ठाम राहतील अशी एकच भूमिका घेऊन विलीनीकरण साठी बेमुद्दत संप करणार आहेत

यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव दत्ता बावणे, प्रवीण ननावरे, मोहमद रफी, महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे विभागीय सचिव, उत्तम बनसोड, गंधम चालक, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव रवींद्र चामलवार, प्रवीण वराठे, महाराष्ट्र एसटी कास्ट्राईब संघटनेचे विभागीय सचिव अशोक माहुरकर, विशाल नगराडे MMK चे विभागीय सचिव संतोष भिवापुरे, गणेश पाचभाई, प्रमोद जुनघरे, भाई जगताप कांग्रेस (Congress) चे , विभागीय सचिव विनोद दातार,  यांच्यासह विविध संघटना पदाधिकारी उपस्थित होते.