महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपकडून राष्ट्रीय राजकारणात संधी #SudhirMungantiwar #BJPNationalCouncil #महाराष्ट्र #भाजपा

महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपकडून राष्ट्रीय राजकारणात संधी

#Loktantrakiawaaz
नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP National President) यांनी त्यांची नवी टीम जाहीर केली आहे. या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), आशिष शेलार (Ashish Shelar), चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि हिना गावित (Heena Gavit) यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. 

जेपी नड्डा यांनी भाजपची 80 जणांची जम्बो टीम आज जाहीर केली. त्यात राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य, प्रवक्ते, सचिव, कार्यालयीन सचिव आणि कोषाध्यक्षांपासून ते राज्य प्रभारींचाही समावेश आहे. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून एकूण 15 जणांचा समावेश आहे. त्यात चार नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
👉🏻 सुधीर मुनंगटीवार, आशिष शेलार पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर

 राष्ट्रीय कार्यकारिणीत
 महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे यांचा समावेश कायम आहे. तर विशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनंगटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणींचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून सुनील वर्मा, हिना गावित, यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांना कायम ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैय्या यांची नियुक्ती कायम ठेवली आहे.

➡️ राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र

नितीन गडकरी
पीयूष गोयल
प्रकाश जावडेकर
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
चित्रा वाघ

➡️ राष्ट्रीय सचिव

विनोद तावडे
सुनील देवधर
पंकजा मुंडे

➡️ विशेष निमंत्रित

सुधीर मुनंगटीवार
आशिष शेलार
लड्डाराम नागवाणीं

➡️ राष्ट्रीय प्रवक्ते

सुनील वर्मा
हिना गावित

➡️ माजी मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

➡️ राज्य प्रदेशाध्यक्ष

चंद्रकांत पाटील

➡️ महाराष्ट्राचे प्रभारी

सीटी रवी,
ओमप्रकाश धुर्वे
जयभान सिंग पवैय्या