लसीकरण करणाऱ्यांना चंद्रपुरातील व्यापारी देणार डिस्काउंट, कोविड लसीकरणाच्या जनजागृतीसाठी व्यापारी सरसावले, फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री चा अभिनव उपक्रम Vaccination Chandrapur Vyapari

लसीकरण करणाऱ्यांना चंद्रपुरातील व्यापारी देणार डिस्काउंट

कोविड लसीकरणाच्या जनजागृतीसाठी व्यापारी सरसावले

फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री चा अभिनव उपक्रम

चंद्रपूर: लसीकरणा वर लोकांमध्ये अजूनही मोठा संभ्रम आहे. अनेक जण घाबरत आहेत. अफावाना बळी पडून लसीकरणाला पाठ दाखवत आहेत. अशात चंद्रपुर शहरातील व्यापारी (Chandrapur City Vyapari) पुढे आले आहेत. जो कुणी लसीकरण करेल त्याला शहरातील काही प्रसिद्ध प्रतिष्ठानात डिस्काउंट (Discount) देण्याची अभिनव योजना जाहीर केली आहे.

चंद्रपुरात ४५ विविध व्यापारी-उद्योजक संघटनांची शिर्षस्थ संस्था म्हणून स्थापित फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या (Fedration Of Trade Commerce And Industry) शिष्टमंडळा ने नुकतीच मनपा महापौर आणि आयुक्त यांची भेट घेतली. त्यावेळी या उपक्रमावर चर्चा करण्यात आली. अध्यक्ष रामकिशोर सारडा, जिल्हा संयोजक रामजीवन सिंह परमार,सुमेध कोतपल्लीवार, महासचिव अनिल टहलियानी, सचिव पंकज शर्मा, जनसंपर्क अधिकारी चिराग नथवानी, प्रभाकर मंत्री, मनीष राजा यांच्या शिष्टमंडळाने महापौर राखी कंचर्लावार (Chandrapur Mayor Rakhi Kancharlawar) , आयुक्त मोहिते आणि उपआयुक्त पोलीवाल यांना सदर उपक्रमाची सविस्तर माहिती देत या पुढेही असेच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मनपा प्रशासनाने (Chandrapur CMC)  या उपक्रमाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. 

असा मिळेल लाभ
फेडरेशन शी जुळलेल्या निवडक दुकानात ही योजना देय असेल. लाभार्थी नागरिक पाहिले किंवा दुसरे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र (Certificate) दाखवतील. त्यानंतर सदर व्यापारी त्यांना निर्धारित टक्या पर्यंत डिस्काउंट देईल. त्यासाठी कूपन देण्याची व्यवस्था केली जाईल. 

पुढे ही अशीच अभिनव पाऊले उचलू
फेडरेशन चे अध्यक्ष राम किशोर सारडा यांनी सांगितले की, भविष्यात अश्या पद्धतीने वेळोवेळी शासन-प्रशासनास सहकार्य करून जन सेवेची कामे केली जातील. फेडरेशन व्यापारी, प्रशासन आणि नागरिक यामधील दुवा म्हणून काम करेल, असे ते म्हणाले.