वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश Wildlife and human conflict can be seen

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य 

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश  

#Loktantrakiawaaz
वरोरा : चंद्रपूर जिल्हा (Chandrapur District) हा वनाने व्यापलेला जिल्हा आहे. येथे मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी व मानव संघर्ष बघावयास मिळतो (Wildlife and human conflict can be seen). चंद्रपुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मानवाच्या मृत्यू वन्य प्राण्याच्या हल्ल्यात होत असतात (In Chandrapur District, A  Large Number Of Human Deaths Are Due To Wild Animal Attacks) . त्यांना तात्काळ मदत मिळणे आवश्यक असते.आमदार प्रतिभाताई धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांच्या प्रयत्नातून मांगली येथील मधुकर कोटनाके या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला शासनातर्फे १५ लाखाचा धनादेश देण्यात आला. 

यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी तुषार तडस, क्षेत्र सहायक डी. आर. इंगळे, क्षेत्र सहायक एन. बोराडे, वनरक्षक पी. मत्ते, वनरक्षक यु. साबळे व मृत शेतकऱ्याचे वासदार मीरा कोटनाके, अनिकेत कोटनाके यांची उपस्थिती होती. 
 
 वरोरा - भद्रावती (Warora- Bhadravati) मतदार संघात कोणत्याच प्रकारच्या येथील भूमीपुत्राचा समस्या प्रलंबित राहता कामा नये, त्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी नेहमी कर्तव्यदक्ष महिला आमदार प्रतिभाताई धानोरकर आग्रही राहतात. पुढे देखील शेतकरी व समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.