▶️ चंद्रपुरातील पाऊणे दोन कोटींच्या दरोड्यातील आरोपींना ठोकल्या बेड्या, पंधरा तासात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 1 करोड 73 लाखांचा मुद्देमाल जप्त Chandrapur Robery Crime Branch

▶️ चंद्रपुरातील पाऊणे दोन कोटींच्या दरोड्यातील आरोपींना ठोकल्या बेड्या

▶️ पंधरा तासात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

▶️  1 करोड 73 लाखांचा मुद्देमाल जप्त

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 19 नवंबर: दिनांक १७/११/२०२१ रोजी पोलीस स्टेशन रामनगर (Ramnagar Police Station, Chandrapur) येथील (Accused In Robbry) फिर्यादी नामे नाजनीन हारून कोलसावाला , वय - ३३ वर्ष, धंदा- घरकाम रा.अरविंदनगर, ३ नंबर टावर जवळ, खनके मिल जवळ , मुल रोड, चंद्रपुर यांनी रिपोर्ट दिली की, दिनांक १७/११/२०२१ रोजीचे दुपारी ४:१५ वाजता दरम्यान आपले घरी आई, सासु हे हजर असतांना पाच अनोळखी इसम हे घरात घुसुन फिर्यादीचे गळयाला चाकु लावुन, फिर्यादीचे सासुचे तोंड दाबुन व नकली पिस्तोलचा धाक दाखवुन फिर्यादीच्या भावाच्या बेड रूम मधील पलंगाच्या बॉक्स मधील थैल्यात भरून ठेवलेले नगदी रोख रक्कम १,७३,५०,००० / - रूपये च्या चार थैल्या दरोडा टाकुन पांढ-या रंगाच्या गाडीने पळुन गेले अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे अपराध क्रमांक १ ९ ६४ / २०२१ कलम ३ ९ ५ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे. नमुद गुन्हयाचे गांर्भीय बधता पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील अधिकारी हर्षल अकरे, पोउपनि भुरले असे व पोलीस कर्मचारी असे घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळाच्या बाजु बाजुच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे (CCTV Camera) व गोपनिय बातमिदार यांचे माहिती प्रमाणे गुन्हयातील अज्ञात अनोळखी आरोपीतांचा शोध घेणे कामी सपोनि हर्षल ओकरे हे डी.बी. पथकासह नागपुर येथे रवाना झाले. तसेच पोउपनि विनोद भुरले हे डी.बी. पथकासह बल्लारशाह, राजुरा येथे गुन्हयात वापरलेले वाहन जप्त करणे कामी रवाना होवुन नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा सायबर सेलच्या मदतीने कठीन परिस्थीतीत कसोसीने शोध घेवुन डी.बी. पथकानी दोन आरोपीतांना नागपुर येथुन ताब्यात घेवुन तसेच पोलीसांनी दिशाभुल करण्याकरीता व पळुन जाणे करीता वापरलेले वाहन हुन्डाई आय २० गाडी क्रमांक MH-27/ BE-0751 गाडी जप्त करण्यात आली व तसेच त्यांचेकडुन दरोडा घालुन चोरून नेलेले च्या नोटा एकुण रोख रक्कम १,७३,००,०००/-  रूपये तसेच गुन्हयात वापरलेली महिंद्रा मरांजो कंपनीची चाकी - चार क्रमांक २००० रू व ५०० रू वाहन MH34 / V- 5999 ची गाडी, नकली पिस्तोल व चाकु जप्त करण्यात आले. सरदचा गुन्हा उघडकीस आणणे कामी गुन्हे शोध पथकातील सपोनि हर्षल अकरे, पोउपिन विनोद भुरले तसेच सर्व डी.बी. पथकातील कर्मचारी हे अतिशय परिक्षम घेवुन गुन्हयातील अज्ञात अनोळखी आरोपीतांचा शोध घेवुन अवघ्या १५ तासात गुन्हयातील आरोपी तसेच गुन्हयातील संपुर्ण रोख रक्कम जप्त केली आहे. सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवे  चंद्रपुर, अप पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी उपविभागिय पोलीस अधिकारी, नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक मधुकर गिते, सपोनि हर्षल अकरे, पोउपनि विनोद भुरले, पो.हवा. रजनीकांत पुठ्ठावार,  प्रशांत शेंदरे, नापोशि/पुरूषोत्तम चिकाटे,  विनोद यादव, पेतरस सिडाम, किशारे वैरागडे,  आंनद खरात, पांडुरंग वाघमोडे, निलेश मुडे, सतिश अवथरे, पोशि लालु यादव, विकास जुमनाके, माजीद पठान, हिरालाल गुप्ता, मनापोशि भावना तसेच सायब पोलीस स्टेशन, चंद्रपुर येथील पोलीस कर्मचारी यांनी केली आहे .