दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
मुंबई, 09 नवंबर : भारतीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानपरिषदेच्या एकूण 8 जागांचा कार्यकाळ संपुष्ठात येत असला तरी सोलापूर आणि अहमदनगर वगळता मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर, या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर निवडणूक होणार आहे.
➡️ अधिसूचना जाहीर : 16 नोव्हेंबर
➡️ अर्ज दाखल करण्याचा दिनाक: 23 नोव्हेंबर
➡️ अर्जांची छाननी: 24 नोव्हेंबर
➡️ अर्ज मागे घेण्याची मुदत: 26 नोव्हेंबर
➡️ मतदान : 10 डिसेंबर (सकाळी 8 ते 4)
➡️ मतमोजणी : 14 डिसेंबर
➡️ निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक: 16 नोव्हेंबर
स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर, या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
👉🏻 मुंबईतून रामदास कदम आणि भाई जगताप, 👉🏻 कोल्हापूरमधून सतेज पाटील,
👉🏻 धुळे नंदूरबार अमरिश पटेल,
👉🏻 नागपूरमधून गिरीश व्यास,
👉🏻 अकोला- बुलडाणा- वाशिममधील गोपालकिशन बाजोरिया
यांचा सहा वर्षांचा कालावधी संपत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानं देगलूर बिलोली निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर विधानपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.