काँग्रेसचे प्रभारी किशोर गजभिये यांचा आरोप
पंडित नेहरू जयंतीचे औचित्य साधून जनजागृती यात्रेला प्रारंभ
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजन
चंद्रपूर : इंधनाचे दर वाढले. घरगुती सिलिंडर महागले. महागाईने उच्चानक गाठला आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. मात्र, पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यात व्यस्त आहेत. एकंदरीत, केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी असल्याची टीका काँग्रेसचे प्रभारी किशोर गजभिये यांनी केली.
केंद्रसरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात काँग्रेसच्या वतीने जनजागृती यात्रा काढण्यात येणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी (ता. १४) शहरातील घुटकाळा प्रभागातून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गजभिये बोलत होते.
यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रामू तिवारी यांनी, केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.
यावेळी केंद्र सरकारचे जनविरोधी धोरण, वाढती महागाई, बेरोजगारी आदी विषयावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
यावेळी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा चित्राताई डांगे, इंटकचे नेते के.के सिंग, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय नळे, संगीताअमृतकर, प्रवीण पडवेकर, गोपाल अमृतकर, अनुसूचित विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष अश्र्विनिताई खोब्रागडे, नगरसेविका वीणा खणके, सकिना अन्सारी, ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र बोबडे, मालक शकीर, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अध्यक्ष सोहेल शेख, दुर्गेश कोडाम, बापू अन्सारी, राजेश अडूर, प्रसन्न शिरवार, राजू वासेकर, पप्पु सिद्दीकी, कुणाल चहारे, संजय गंपावार, प्रोफेशनल काँग्रेसचे मनीष तिवारी, सेवादलाच्या महिला अध्यक्षा स्वाती त्रिवेदी, सुनील पाटील, प्रीती शाह, संजय रत्नपारखी, कृणाल रामटेके, अजय बल्कि, सुनील पाटील, चंदा वैरागडे, चंद्रमा यादव, राज यादव, प्रकाश देशभ्रटकर, इरफान शेख, संगीता मित्तल, रवी रेड्डी, चेतन दुरशेलवार, कासिफ अली यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.